T-20 विश्वचषकावर भारताचा कब्जा! दुसऱ्यांदा रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मिळविला विजय

    30-Jun-2024
Total Views |

India lifts second T20 World Cup Trophy
 (Image Source : tw/@ICC)

एबी न्यूज नेटवर्क :
अमेरिका- वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी T20 विश्वचषकावर भारतीय संघाने कब्जा (India lifts second T20 World Cup Trophy) केला आहे. टीम इंडियाने तब्बल तेरा वर्षांनी इतिहास रचला असून, दुसऱ्यांदा T 20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.


बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रोमहर्षक सामना रंगला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भारताने मोठ्या संघर्षानंतर दमदार विजय मिळवला आहे. एका क्षणी सामना भारताच्या हाताबाहेर गेला होता. पण भारतीय गोलंदाजांनी सामना खेचून आणला. सामन्याच्या अंतिम क्षणात सूर्यकुमार यादव यांनी घेतलेल्या कॅचने समना भारताच्या झोळीत टाकला. हार्दिक पांड्या आणि बुमराहच्या ओव्हर्सचे खूप महत्त्वाचे योगदान होते.



टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 169 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 52 सर्वाधिक धावा केल्या.
 


भारती इंडियाचे धुवाधारक फलंदाज विराट कोहली याला ऑफ द मॅच अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
 
अभिनंदनचा वर्षाव
भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विश्वचषकावर आपल्या नाव कोरल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन
राष्ट्रपती द्रपदी मुरमी यांनी एक्सवर पोस्ट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या, T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे मी हार्दिक अभिनंदन करते. नेव्हर-से-डाय स्पिरिटसह, भारतीय संघाने कठीण परिस्थितीतून प्रवास केला आणि संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्ये दाखवली. अंतिम सामन्यात हा अभूतपूर्व विजय होता. शाब्बास, टीम इंडिया! आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे!, असे त्या म्हणाल्या.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचे केले अभिनंदन
पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे, ते म्हणाले, हा क्षण ऐतिहासिक, संस्मरणीय आहे. तुमच्या कामगिरीचा 140 कोटी देशवासीयांना अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. खेळाच्या मैदानावर तुम्ही विश्वचषक नक्कीच जिंकलात, पण देशासाठी तुम्ही प्रत्येक गल्लीतील मने जिंकलीत. ही स्पर्धा एका वेगळ्या कारणासाठीही लक्षात राहील. यावेळी टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही, ही काही छोटी गोष्ट नाही. माझ्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन.'
 


नितीन गडकरींनी केले अभिनंदन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सवर ट्विट करत म्हंटले की, टीम इंडियाचे दुसरे T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. आमच्या निर्भय फलंदाजांनी, आमच्या अथक गोलंदाजांनी, ज्यांनी आमच्या सन्मानाचे रक्षण केले, आमच्या निर्भय फलंदाजांच्या चमकदार कामगिरीने, हा विजय खरोखर ऐतिहासिक आहे. प्रत्येक खेळाडूने कौशल्य, उत्कटता आणि एकता दाखवून त्यांचा A-गेम आणला. तुम्ही पुन्हा आमची मान गर्वाने उंचावली आहे. हा विजय प्रत्येक भारतीयाचा आहे जो स्टँड आणि त्यापलीकडे जल्लोष करत आहे.