युवराज सिंग कडे भारतीय संघाची कमान

    03-Jun-2024
Total Views |

yuvraj singh to lead the indian team
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रथमच चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्ससाठी इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्या कडे देण्यात आली आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचाही संघात समावेश आहे. या लीगमध्ये एकूण 6 देश सहभागी होणार आहेत. हे सामने आज 3 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवले जातील. 13 जुलै रोजी फाइल मॅच होणार आहे.
 
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मान्यता दिलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप, लिजेंड्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून दिग्गज क्रिकेटपटूंना एक नवीन व्यासपीठ प्रदान करेल. 15 सदस्यीय भारत चॅम्पियन्स संघ भारतीय क्रिकेटच्या ताऱ्यांनी सजला आहे.
 
असा आहे भारत चॅम्पियन संघ :
युवराज सिंग (कर्णधार), हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, युसूफ पठाण, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी.