डिहायड्रेशन होत असेल तर आरोग्य परिषदेने शिफारस केलेले ओआरएस घ्या; तज्ज्ञांचे मत

    03-Jun-2024
Total Views |
Experts Recommend Taking ORS for Dehydration
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
उन्हाळ्याचा तडाखा वाढल्यास लहान मुलांच्या जीविताला अतिसाराचा धोका असतो, त्यामुळे तज्ज्ञांनी सुरक्षित ओआरएसचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
 
भारतात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. अशात सगळ्यांनाच, विशेषत: लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. आपल्याकडे बालमृत्यूच्या सर्वाधिक कारणांमध्ये अतिसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरेतर, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ओआरएस) हे एक अत्यावश्यक औषध आहे. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NFHS-5 data च्या अहवालानुसार, अतिसाराचा त्रास असलेल्या मुलांपैकी फक्त ६०.६ टक्के मुलांना ओआरएस दिले जाते. ओआरएसबद्दल अधिक जागरुकता आणि त्याचा योग्य वापर करण्याची गरज या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.
 
वाढत्या उन्हाळ्यात योग्य माहितीनुसार ओआरएस निवडण्याचे महत्त्व विषद करताना एम्स नागपूरच्या पिडीॲट्रिक्स प्रोफेसर आणि प्रमुख डॉ. मीनाक्षी गिरिश म्हणाल्या, “अतिसार आणि डिहायड्रेशनवर योग्य उपाय करण्यासाठी योग्य ओआरएस निवडणे गरजेचे आहे. साखर असलेली सगळी पेये ओआरएस नसतात! (किंवा ओआरएस म्हणजे फक्त साखरयुक्त पेय नव्हे.) ओआरएस आणि व्यावसायिक स्वरुपावर उपलब्ध साखरयुक्त पेये यातला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. या पेयांमधून मर्यादित प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रव्ये मिळत असली तरी वेगाने रिहायड्रेशन होण्यासाठी आवश्यक सुयोग्य प्रमाणातील ग्लुकोज-सोडिअम आणि पोटॅशिअमची गरज यातून पूर्ण होत नाही. त्यामुळे, साखरयुक्त पेयांऐवजी डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त ओआरएस निवडणे हे एकूणच आरोग्याच्या दृष्टीने, विशेषत: उन्हाळ्यात लहान मुलांसाठी फार महत्त्वाचे आहे.”
 
उन्हाळ्यात योग्य प्रमाणात हायड्रेशन राखण्यासाठी आखलेल्या जनजागृती उपक्रमातून जागतिक आरोग्य परिषदेने (डब्ल्यूएचओ) प्रमाणित केलेल्या ओआरएस सोल्युशन्सचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे. प्रोलाइट ओआरएस, डॉ. मॉर्पेन ओआरएस किंवा ओआरएस वॉलिट ओआरएस अशा मान्यताप्राप्त ब्रँड्समध्ये हे प्रमाण पाळले जाते. त्यामुळे डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी हा एक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरतो.
 
नागपूरमधील बोधनकर चिल्ड्रेन हॉस्पिटलचे कन्स्लटिंग निओनॅटोलॉजिस्ट पेडिॲट्रिशन आणि सीओएमएचएडी यूकेचे कार्यकारी संचालक डॉ. उदय गोविंदराव बोधनकर जोग यांनी मुलांमधील अतिसारावर उपचार करण्यात आणि डिहायड्रेशन रोखण्यात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) किती महत्त्वाचे आहे हे नमूद केले. ते म्हणाले, “अतिसारामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट फार वेगाने कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होते. यावर ओआरएस हा एक साधा मात्र प्रभावी उपचार आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक घटक जपले जाऊन लहान मुलांमध्ये वेगाने सुधारणा होते. ओआरएस परिणामकारकही आहे आणि सुरक्षितही, हे आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या प्रमाणातील मीठ आणि साखर धोकादायक ठरू शकते. डिहायड्रेशनवर सुयोग्य उपचार करण्यासाठी पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे सुयोग्य प्रमाणातील मिश्रण आवश्यक असते. घरच्या घरी चुकीच्या प्रमाणात बनवलेले द्राव किंवा साखरेची पेये हा समतोल बिघडवू शकतात आणि त्यातून डिहायड्रेशन वाढण्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय, काही गंभीर प्रकरणात मृत्यूही ओढवू शकतो.”
 
योग्य माहितीच्या आधारे निवड करणे आवश्यक आहे. डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर साखरयुक्त पेयांऐवजी डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त ओआरएस सोल्युशनला प्राधान्य द्या. साखरयुक्त पेये डिहायड्रेशनवर उपचार करण्यासाठी योग्य पर्याय नाहीत. ओआरएसचे फायदे आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर कसा करावा हे समजून घेतल्यास आपण व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम करू शकतो, विशेषत: अशा प्रखर आणि त्रासदायक उन्हाळ्याच्या दिवसांत. या माहितीमुळे आपण दरवर्षी हजारो मुलांचे प्राण वाचवू शकतो.