(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे वाघाने गायीवर हल्ला केल्याने गंभीर जखम झाली आहे. तर याचदरम्यान मेंढपाळ महिला थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रहिवाशी परिसरात वन्य प्राण्यांचा सरार्स वावर पाहायला मिळत आहे. तर यातच वाघांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील रहिवासी संजय थोरे यांची पत्नी सुषमा थोरे या आपल्या गायी चारण्यासाठी जवळच्या जंगलात गेल्या होत्या. दरम्यान, जंगलात घात लावून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला केला. वाघाच्या अचानक झालेल्या हल्ल्याने महिले आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला.
महिलेचा धावा आणि आरडाओरडा ऐकून इतर मेंढपाळही धावून आले. याचदरम्यान वाघ तेथून जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे गाईचे प्राण वाचले, मात्र स्थानिक ग्रामस्थ प्रचंड घाबरले असून वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.