(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव विदर्भातील सर्व अभयारण्यातील जंगल सफारी बंद १ जुलैपासून तीन महिन्याकरिता बंद राहणार आहे. यंदा सफारी ३० जूनपर्यंतच उपलब्ध असेल. १ जुलै ते सप्टेंबर अखेर जंगल सफारी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना तीन महिने जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही.
पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड कऱ्हांडला, बोर व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रभावित झालेल्या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. जंगल पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हा निर्णय वन विभागाकडून घेण्यात आला आहे. हे रस्ते कच्चे आणि मातीचे आहेत. पावसाळ्यात खूप चिखल होतो. त्यामुळे जीप व इतर वाहने अडकून पर्यटकांना त्रास व असुरक्षित परिस्थिती निर्माण होते. ही कारणे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात जंगल बंद करण्यात आली आहे.