देशातील सर्वात प्रभावी विदितज्ञ म्हणून डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद

24 Jun 2024 19:20:34
- 'सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट विधीज्ञ' म्हणून मिळाला मान
 
Dr Kshitija Sumit Wankhede
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
2008 साली नागपूर विद्यापीठातील "सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पूरस्कार" विजेत्या ऍड क्षितिजा गुणवंतराव वडतकर आताच्या क्षितिजा सुमित वानखेडे यांनी 'फोर्ब्स लिगल पावरलिस्ट' या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ. क्षितिजा यांना सुचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट वकिल तज्ज्ञ म्हणून मान मिळाला आहे.
 
राष्ट्रीय पातळीवर चौफेर कामगिरी बजावण्याचा मान विदर्भातील डॉ. क्षितीजा यांनी पटकावला आहे. देशातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून नोंद घेण्यात आली आहे. दोन श्रेणीत स्थान मिळविण्याचा बहुमान मिळविणाऱ्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला वकिल आहेत. 2007 मध्ये नागपूर विद्यापीठाच्या "सर्वोत्कृष्ट वक्ता" म्हणून सुद्धा डॉ. क्षितिजा वडतकर यांनी बहुमान प्राप्त केला होता. 2023 मध्ये 'इंडिया टू डे' या प्रख्यात मासिकाने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिला म्हणून सन्मानित केले आहे. 'संविधान व मानवाधिकार' या विषयात केलेल्या संशोधनाबद्दल नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे.
 
राज्यातील आर्थिक गुन्हे क्षेत्रातील आघाडीच्या वकिल असून त्या प्रसिध्द 'लॉ फर्मच्या' संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या यादीत दोन श्रेणीत प्रथम एका महिला वकिलास असे नामांकन मिळाले आहे. त्याबद्दल बोलतांना डॉ. क्षितिजा वानखेडे म्हणाल्या की. '15 वर्षापूर्वी गुणवत्ता व पदकांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन वर्धा वरुन मुंबईला आले. मला त्यावेळी कुणाचा आधार नव्हता. मात्र. कायद्याच्या क्षेत्रात स्वत: ची ओळख निर्माण करण्यास प्राधान्य देवून अथक परिश्रमानंतर देशातील सर्वोच्च कायदा कंपनीत उच्च पदावर पोहचल्यानंतर स्वत: ची संस्था सूरु करण्याचा निर्णय घेतला'. होतकरु वकिलांना संधी देण्यासोबतच महिला व वंचित घटकास त्यांचे सामाजिक हक्क मिळवून देण्याचे त्यांचे धोरण आहे. असंख्य अशी प्रकरणे यशस्वी खटले सोडविण्यात यश मिळाले. त्यामुळेच महिला व मानवी हक्क याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नामांकिंत विधी संस्थामध्ये. राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासोबतच पहिल्या पिढीतील वकिलांना त्यांनी एक उद्योजक म्हणून वागविले आणि त्यांना समान भावना बाळगण्यासाठी प्रोत्साहित केले. संस्थेचे कामकाज एका विशिष्ट उद्देशाने सुरु असल्यामुळे सकारात्मक बदल घडून आणण्यात सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. क्षितिजा यांनी सांगितले.
 
'फोर्ब्स' मध्ये सादर केलेल्या माहितीचा कागदोपत्री पुरावा. साक्षीदारांचा तपशील. ज्युरी मंडळी आर्वजून तपासतात म्हणून या प्रकियेत सादर करणार असलेली प्रत्येक बाब प्रामाणिक असावी याकडे 'फोर्ब्स' कटाक्षाने लक्ष दिले जाते हा बहुमान कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारा असल्याचे डॉ. क्षितिजा वानखेडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळविणाऱ्या डॉ. क्षितिजा या वर्धा येथिल सेवानिवृत्त प्रा. गुणवंतराव वडतकर आणि प्राध्यापिका पूर्णिमा वडतकर यांच्या कन्या आहेत.
Powered By Sangraha 9.0