'नागस्त्र-१' ची पहिली तुकडी भारतीय लष्कराला सुपूर्द

    14-Jun-2024
Total Views |

First batch of Nagastra 1 drone handed over to Indian Army
(Image Source : Twitter/ Screengrab)
 
एबी न्यूज नेटवर्क :
भारतीय लष्कराला "नागस्त्र-१" नावाच्या मानवरहित सुसाईड ड्रोनची पहिली तुकडी मिळाली आहे. ड्रोन शत्रूच्या प्रशिक्षण शिबिरांवर, लाँच पॅडवर आणि घुसखोरांवर अचूकपणे मारा करण्यास सक्षम असल्याचे सांगितल्या जात आहे. नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (EEL) द्वारे देशातच हा हाय-टेक ड्रोन पूर्णतः डिझाइन आणि विकसित करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन मध्ये 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री लावण्यात आली आहे. सोलर इंडस्ट्रीजने विकसित केलेले पहिले स्वदेशी लोइटरिंग युद्धसामग्री, नागस्त्र-1 हे भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने आपत्कालीन खरेदी अंतर्गत 480 लोइटर युद्धसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी सोलर इंडस्ट्रीज इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (EEL) ला ऑर्डर दिली आहे. ज्यापैकी 120 नागस्त्र-1 लष्कराच्या दारूगोळा डेपोला देण्यात आले आहेत, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
अशी आहेत नागस्त्र-१ ची वैशिष्ट्ये
अधिकाऱ्यांनी सांगितल्या नुसार, स्वदेशी नागस्त्र-१ मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. या ड्रोनमध्ये कामिकाझे मोड आहे, ज्याद्वारे तो दोन मीटरपर्यंत जीपीएसच्या मदतीने कोणताही धोका तटस्थ करू शकतो. नऊ किलोग्रॅम वजनाचे मानवरहित हवाई वाहन 30 मिनिटे उडू शकते. मॅन इन लूप रेंज 15 किमी आहे आणि ऑटोनॉमस मोड रेंज 30 किमी आहे. त्याची इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली 200 मीटरपेक्षा जास्त उंचीवर शत्रूचा शोध घेण्याचे काम करते.