अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर मनपात रुजू

    10-Jun-2024
Total Views |

Additional Commissioner Ajay Charthankar joins NMC
 
नागपूर :
महाराष्ट्र शासन आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर हे नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर सोमवारी (10) रुजू झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. उपायुक्त प्रकाश वराडे यांनी चारठाणकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त आंचल गोयल यांची भेट घेतली. त्यांनी मनपाच्या विविध कार्याची माहिती जाणून घेतली.