रसिकांच्या भेटीला लवकरच येतेय ‘कॉल मी बे’!

    28-May-2024
Total Views |

Prime video series Call Me Bae premiered on 6th September
 (Image Source : Agency)

मुंबई :
‘प्राइम व्हिडिओ’ हे देशातील सर्वाधिक बघितले जाणारे मनोरंजनाचे माध्यम असून त्यांनी बहुप्रतिक्षित ‘कॉल मी बे’ या हिंदी मूळ मालिकेच्या जगभरात होणाऱ्या प्रीमियरची तारीख जाहीर केली. ‘कॉल मी बे’ या मालिकेचा प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होत आहे. ‘धर्माटिक एन्टरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा हे कार्यकारी निर्माते आहेत. इशिता मोईत्राद्वारे निर्मित आणि कॉलिन डी’कुन्हा दिग्दर्शित, ८ भागांच्या या मालिकेत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. बेल्ला ‘बे’ चौधरी म्हणून अनन्या या ओरिजनल मालिकेत पदार्पण करत आहे.

अनन्या पांडे हिच्यासोबत या मालिकेत वीर दास, गुरफतेह पिरझादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर यांचा समावेश आहे. भारतात आणि जगभरातील २४० हून अधिक देश-प्रदेशांमध्ये हा प्रीमियर दिसू शकेल. ‘कॉल मी बे’ प्रदर्शित झाल्यानंतर सर्व ‘प्राइम’ सदस्यांना तो बघता येईल. भारतात वर्षभरासाठी केवळ १४९९ रु. भरून ‘प्राइम’ सदस्यत्व घेता येते आणि बचत, सुविधा आणि मनोरंजनाचा आनंद लुटता येतो.
 

इशिता मोईत्रा, समिना मोटलेकर आणि रोहित नायर लिखित, ‘कॉल मी बे’ ही अशा ‘बे’ची कहाणी आहे, जी बड्या मालमत्तेची वारस असते आणि अट्टल जुगारी झाल्याने तिची अवनती होत जाते. तेव्हा तिला कळते की, तिची सर्वात मौल्यवान मालमत्ता ही तिचे हिरे नसून तिची ‘स्ट्रीट स्मार्ट’ शैली आहे. पूर्णपणे कफल्लक होऊनही ती स्वत:ला खचू देत नाही आणि ती मुंबईच्या न्यूजरूम्समध्ये स्वत:ला प्रस्थापित करते आणि स्वत:त सुधारणा करत यशस्वी होते.