जनता भडकली; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात रस्त्यावर प्रदर्शन

    27-May-2024
Total Views |

street demonstrations against prime minister benjamin netanyahu
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क:
इस्रायलच्या लष्कराने गाझामध्ये हमासच्या अतिरेक्यांविरुद्ध युद्ध पुकारले असताना नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात जनता भडकली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलक आणि सुरक्षा जवानांमध्ये झटापटही झाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्रायलवर भीषण हल्ला केला, इस्रायली लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमधील युद्ध निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. उत्तर गाझामधील कारवाईनंतर आयडीएफने आता दक्षिण गाझामध्ये कारवाई सुरू केली आहे.
 
हमासच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या युद्धादरम्यान, पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांच्याच देशात प्रचंड विरोध होत आहे. नेतन्याहू हे इस्रायलमधील नागरिकांचे संरक्षण करू शकले नसल्याचा आरोप केला जात आहे. अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हमासचे दहशतवादी इस्रायली महिला सैनिकांवर अत्याचार करताना दिसत आहेत.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इस्रायलचे लोक पुन्हा एकदा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात गेले आहेत. राजधानीमध्ये हजारो नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.