मुलांवर होणाऱ्या सोशल मीडियाचा दुष्परिणामांबद्दल इलॉन मस्कने व्यक्त केली चिंता

    25-May-2024
Total Views |

elon musk expressed concern about the negative effects of social media on children
(Image Source : Internet / Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
इलॉन मस्क अनेकदा सोशल मीडियाचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलत असतात, त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी सोशल मीडियाचा मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. सोशल मीडिया मुलांनी किती वापरावा, याबाबत नियम ठरवण्याची गरज असल्याचे मस्क म्हणाले.
 
इलॉन मस्क यांनी सोशल मीडियाचे तोटे सांगितले. मस्क म्हणाले की, 'सोशल मीडिया कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. जेणेकरून लोक शक्य तितक्या वेळ ॲप्स वापरतील. हे मुलांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे की त्यांची मुले सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नयेत.'