...म्हणून कॅनडामधील भारतीयांमध्ये उसळली संतापाची लाट

24 May 2024 16:07:41

Angerwave in Indian community over prince edward island decision
(Image Source : tw/@IndianTechGuide)
 
एबी न्यूज नेटवर्क :
कॅनडातील प्रिन्स एडवर्ड आयलंडच्या (Prince Edward Island) प्रशासनाने एक निर्णय घेतल्याने भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थ्यांनीही रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत.
 
वृत्तसंस्था द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स एडवर्ड आयलंडच्या प्रशासनाने इमिग्रेशन परवानग्या 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमात अचानक बदल केल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात पाठवले जात आहे. त्यामुळे हिंसक निदर्शने होण्याची शक्यता बळावली आहे. अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आमचे भविष्य अंधकारमय झाल्याचे भारतीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 
 
कॅनडाच्या या प्रांताने अशा निर्णयामागचे कारण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा अतिरेक असल्याचे मानले जाते. प्रिन्स एडवर्ड आयलंडच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, आमच्याकडे सध्या चांगल्या प्रकारे विकसित पायाभूत सुविधा नाहीत. संपूर्ण कॅनडामध्ये हीच स्थिती आहे. निवास किंवा आरोग्यासाठी पुरेशी व्यवस्था सापडत नाही. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0