‘पुष्पा २' च्या ‘अंगारों’ गाण्याने घातली प्रेक्षकांना भुरळ

    24-May-2024
Total Views |

Audience mesmerized by the song Angaaron from Pushpa 2
 (Image Source : YouTube Video/ Thumbnail)
 
एबी न्यूज नेटवर्क :
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा : द राइज' ने केवळ तेलुगू भाषेतच नव्हे तर हिंदी दर्शकांची मने देखील जिंकून घेतले. अल्लू अर्जुनच्या धमाकेदार अभिनयाच्या जादूने चित्रपटाचे संवाद (डायलॉगच) नव्हे, तर डान्स स्टेप्स सुद्धा खूप फेमस झाले. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पुष्पा चित्रपट सुद्धा सामील झाला. चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा अशा टप्प्यावर संपली आहे, जिथून दुसरा भाग सुरू होईल. या चित्रपटाला रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत दुसरा भाग लवकरात लवकर पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
आता एक जबरदस्त टीझर आणि ‘पुष्पा पुष्पा’ हे हिट गाणे रिलीज करण्यात आले आहे. याशिवाय रश्मिका मंदानाच्या श्रीवल्लीचे पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे दुसरे गाणे घोषित करण्यात आले आहे. ‘अंगारों’ (द कपल सॉन्ग) या दुसऱ्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
 
 
चित्रपटातील पहिले गाणे ‘पुष्पा पुष्पा’हे दोन्ही सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.