शाहरुख खान अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल; नेमकं झालं काय?

    22-May-2024
Total Views |

Shah Rukh Khan admitted to KD Hospital in Ahmedabad
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच सुपरस्टार शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानची प्रकृती अचानक खालावल्याने बुधवारी दुपारी अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलासायक बाब म्हणजे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात देण्यात आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान मंगळवारी आयपीएल (IPL) प्ले ऑफ सामन्यासाठी त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्सला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचला. दरम्यान उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्याला उष्माघात झाला. यानंतर त्याची प्रकृती खालावताच शाहरुखला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्याला घरी देखील सोडण्यात आले. डिहायड्रेशन हे शाहरुख खानची प्रकृती खराब होण्यामागचे मुख्य कारण होते.
 
21 मे रोजी किंग खान आपल्या टीम कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला. या सामन्यात किंग खानच्या संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. सामना संपल्यानंतर तो अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 मे रोजी दुपारी शाहरुखची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्याला उपचारासाठी घाईघाईने केडी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला डिस्चार्ज दिला. मात्र, अभिनेत्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.