एलोन मस्कने बदललेले डोमेन नाव; ट्विटर आता पूर्णपणे झाले x.com

    18-May-2024
Total Views |

Elon Musk changed domain name of X
(Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
मायक्रो ब्लोगिंग साईट ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी ट्विटर आताचे एक्स याबाबत ट्विट करीत सर्वांना एक मोठी माहिती दिली आहे.
 
ट्विटरचे आता पूर्णतः x.com असे झाले आहे. एलोन मस्क यांनी ट्विटरचे सूत्रे हातात घेतल्यापासून ट्विटरवर सतत बदल होत आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर उद्योगपती एलोन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे ठेवले होते.मस्कने ट्विटरचा लोगो देखील बदलला, तसेच वापरकर्त्यांकरिता ब्लू सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरचे डोमेन नाव देखील बदलले आहे. पूर्वीच्या ट्विटरला आता पूर्णतः एक्स या नावानेच ओळखल्या जाणार आहे.
 
काय केले ट्विट...
 
एलोन मस्क यांनी एक्स वर पोस्ट करीत लिहिले आहे की, आता सर्व कोर सिस्टम x.com वर आहेत. खालील संदेश X च्या लॉगिन पृष्ठावर दिसतो: 'आम्ही आमची URL बदलत आहोत, परंतु तुमची गोपनीयता आणि डेटा संरक्षण सेटिंग्ज समान राहतील.