तब्बल 18 वर्षांनंतर साऊथची सुपरस्टार जोडी होतीय वेगळी

    09-Apr-2024
Total Views |
south superstar dhanush and aishwarya rajinikanth are getting divorced(Image Source : Internet/ Representative) 
 
एबी न्यूज नेटवर्क :
लग्न गाठी या स्वर्गातून बांधून येतात असे म्हटले जाते, पण हल्ली घटस्फोटाच्या घटना देखील वाढत चालले आहे. साऊथची सुपरस्टार जोडी वेगळी होत असल्याची माहीती पुढे आली आहे, ही जोडी तब्बल 18 वर्षाच्या संसारानंतर वेगळी होत आहे ही जोडी म्हणजे साउथ चा सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत ही आहे.
 
साऊथचा सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोघांचे फॅन फॉलोअर्स निराश झाले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने परस्पर सहमती दर्शवल्यानंतर दोघांनी चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी काही दिवसांत सुरू होणार आहे.
 
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 2004 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचे वैवाहिक आयुष्य 18 वर्षे टिकले. धनुष आणि ऐश्वर्या दोन वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. तसेच, दोघांनी 2022 मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. धनुष आणि ऐश्वर्याने दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा केल्यानंतर घटस्फोट घेतला नाही. त्यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची अफवा पसरली होती. त्या काळात दोघेही आपापल्या कामात खूप व्यस्त होते.