सप्तक तर्फे ‘बगळ्यांची माळ फुले’ 27 रोजी

    23-Apr-2024
Total Views |

Bagalyanchi Mal Phule program by Saptak on 27th
 
 
नागपूर :
सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या 98 व्या जन्मदिनानिमित्त सप्तकतर्फे शनिवार, 27 एप्रिल रोजी ‘बगळ्यांची माळ फुले’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्सिस्टंट सिस्टीम, आय टी पार्क गायत्री नगर येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांच्या संगीताने अजरामर झालेली गीते गायक सादर करणार आहेत.
 
मराठी संगीतप्रेमींना ज्यांच्या गाण्यांनी अक्षरशः भुरळ घातली अशी खळे काकांची गाणी प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी, डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर, सारंग जोशी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे रसपूर्ण संचालन सुप्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर करणार आहेत. संगीत नियोजन महेंद्र ढोले यांचे असून विक्रम जोशी यांचे सहकार्य लाभले आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सप्तकची सभासद नोंदणी सुरू आहे. कार्यक्रमाला स्वरकमल, पर्सिस्टंट सिस्टीम, स्पेसवूड, जॉन्सन लिफ्ट, थिंक आणि ॲकमे इंजिनिअरिंग यांचे सहकार्य लाभत आहे.