- राज्यस्तरीय परिक्षेत कमाविला प्रथम क्रमांक
हिवरखेड :
येथील महात्मा फुले हायस्कूल ची वर्ग 9 ची विद्यार्थ्यीनी वैष्णवी सुनील तायडे हीने नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रभाषा प्रबोध या परीक्षेत संपूर्ण विदर्भातून प्रथम क्रमांक प्राप्त करत स्वतः च्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखविली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात वैष्णवी ने नेत्रदिपक यश प्राप्त करून आपले कुटूंब, शाळेचे व गावाचे नाव लौकिक केले आहे. वैष्णवी ने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक शशिकांत डेहनकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा दातीर, त्याचप्रमाणे श्रीकांत जोशी, सुनील नाईक, प्रमोद खसारे, गोपाल जावरकर, किशोर गहुकर, संजय गेडाम, प्रदीप उघडे, रवींद्र साव, युवराज बगाडे, दिनेश मेश्राम, शालिमा गडेकर, संगीता सरदार, शाळेच्या पर्यवेक्षिका नंदा थोरात, दर्शना पाटील, स्नेहल यावलकर, विनोदराव वासनकर, मधुकरराव कवठकर, हिम्मतराव खवले, मेघा सोमकुवर, सुभाष पारिसे, अमोल इंगळे तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला दिले.
वैष्णवीच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेबराव पाटील व इतर संचालक मंडळी, शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचा:यांनी वैष्णवीचे अभिनंदन करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.