मी तुमच्या प्रेमाचे ऋण व्याजासह परत करेल : मुनगंटीवार

    18-Apr-2024
Total Views |
 
Sudhir Mungantiwar
 
 
चंद्रपूर :
मी राज्याचा वित्तमंत्री राहिलो आहे. जे कर्ज घेतो ते व्याजाने परत करतो. जोरगेवारजी, तुमच्या प्रेमाचे ऋण व्याजासह परत करेल, असे सूचक वाक्य चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमदेवार सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. यंग चांदा ब्रिगेडचा मेळावा बुधवारी दुपारी चंद्रपुरातील शकुंतला लॉन येथे पार पडला.
 
हा मेळावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांची मने जुळली. तसे हे दोघे नेते यापूर्वी एकाच मंचावर आलेच नाही असे नाही, पण त्यांच्यात जो दुरावा होता तो स्पष्टपणे जाणवत होता.
 
मुनगंटीवार यांची उमदेवारी जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारचा घटक म्हणून जोरगेवार त्यांचा प्रचार करतील का, असा प्रश्न विचारला जात होता. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनीही जोरगेवार यांना तशी सूचना केली होती. पण मंगळवारी मंत्री छगन भुजबळ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची मनधरणी केल्यानंतर खर्या अर्थाने जोरगेवार मैदानात आले. त्याच वेळी त्यांनी या मेळाव्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी तो यशस्वी करूनही दाखवला. पहिल्यांदाच या गुरू-शिष्याला मंचावर इतके सहज बघता आले.
 
माझा हा 'विनींग शॉट': जोरगेवार
तीव्र उष्णतेमुळे 18 ते 20 एप्रिलपर्यंत शाळा बंद राहणार अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही मेळावा का घेत आहात असे विचारले जात आहे. पण हा आमचा 'विनींग शॉट' आहे. मुनगंटीवार जिंकतील यात शंकाच नाहीच, उलट ते 1 लाखावर मतांच्या आघाडीने जिंकतील. त्यांचे माझे नाते खुप भावनिक आहे. माझ्यासाठी ते नेहमी आदर्श राहिले आहे, असे गौरवोद्गार आ. किशोर जोरगेवार यांनी काढले.