मला माझ्या प्रभू श्री रामांनी खोटे बोलणे शिकवले नाही : विकास ठाकरे

    18-Apr-2024
Total Views |
- भाजपचा जाहीरनामा म्हणजे आणखी एक जुमला

BJPs manifesto is another jumla 

नागपूर :
समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेसने सादर केलेला पाच न्यायातील पंचवीस बिंदूचा गॅरंटी कार्ड हा ऐतिहासीक जाहीरनामा आहे. यातीस सर्व न्याय हे वास्तविक असून या सर्वांची अंमलबजावणीही झाल्यास सामान्यांच्या जीवनातील अनेक समस्या मार्गी लागती. मात्र भाजप प्रमाणे रेटून खोटं बोलण्याचा प्रकार मला माझ्या प्रभू श्री रामांनी शिकवला नाही. त्यामुळे मी काही खोटं बोलणार नसून जे शक्य आहे तेच बोलणार असल्याचे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या जाहीर नाम्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
 
प्रामुख्याने काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे, प्रफुल गुडधे-पाटील, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, बंटी शेळके, कुणाल राऊत यांची उपस्थिती होती.
 
पुढे ठाकरे म्हणाले की, “देशात तसेच नागपूरच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षात दोनवेळा मतदारांनी भाजपला संधी दिली. मात्र या दहा वर्षात सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच गोरगरीबांच्या हितासाठी सरकारने काहीच केले नाही. तसेच २०१४ आणि २०१९ मधील जाहीर नाम्यातील आश्वासने हवेतच राहीली. विकासाच्या नावावर शहराच्या पर्यावरणाचा ऱ्हास सत्ताधारी करत असून नागरिकांच्या पैशांची सर्सास लुट करत आहे. त्यानुसारच यंदाचा भाजपचा जाहीरनामा म्हणजे आणखी एक निवडणुकीचा जुमलाच ठरणार आहे.”