वाडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत यांची चर्चा

    18-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut discussion for Mahavikas Aghadi candidate in Wadi
 
वाडी :
दत्तवाडी चौकात शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी (इंडिया) चा प्रचारानिमीत्य कार्यकर्त्यासोबत चर्चा केली. रामटेक लोकसभा क्षेत्रांतर्गत असणारे महाविकास आघाडी (इंडिया) चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी (इंडिया) चे कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक वार्डात जाऊन घरोघरी पत्रके वाटप केली व लोकसभेत महाविकास आघाडी (इंडिया) चा खासदार निवडून देण्याचे आवाहन केले. नागरिकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोकशाही विरूध्द हुकूमशाही मध्ये काटयाची टक्कर असुन जनता लोकशाहीच्या बाजुने असल्यामुळे श्यामकुमार बर्वे निवडून येतील असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले.
 
यावेळी शिवसेना - युवासेना राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य हर्षल काकडे,राजेश जयस्वाल, माजी नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराने, शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमुख संतोष केचे, तालुकाप्रमुख संजय अनासाने,काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, जि.प. सदस्य भारती पाटील, जि.प. सदस्य ममता धोपटे, तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अश्विन बैस, उपसरपंच रॉबीन शेलारे, उपसरपंच बंडू गजभिये, कृषीसंचालक महेश चोखांद्रे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वसंतराव ईखनकर, शिवसेना वाडी शहरप्रमुख मधु मानके पाटील, काँग्रेसचे वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विजय मिश्रा काँग्रेसचे महासचिव दुर्योधन ढोणे, अनिल पाटील, भिमराव कडू, भिमराव लोखंडे, शैलेश कडू, संजय जीवनकर, योगेश कुमकुमवार, माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे श्याम मंडपे, प्रदेश सचिव मोहन ठाकरे, हिंम्मत गडेकर,अमित हुसनापुरे, दिनेश उईके, दिलीप दोरखंडे, शिवसेनेचे रुपेश झाडे, युवासेनेचे कपिल भलमे, अखिल पोहनकर, संदीप उमरेडकर, क्रांतीसिंग, योगेश कुमकुमवार, विलास भोंगळे, अमोल सोनसरे, पंकज कौंडण्य, सुबोध जांभुळकर उपस्थित होते.