वाडी :
नागपूर वन विभाग व वाडी येथील जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील 'नेचर ग्रीन क्लब' तसेच प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांकरीता निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निसर्ग अभ्यासाकरिता गोरेवाडा उद्यान येथे भेट दिली व बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथील जीवशास्त्रज्ञ श्रीदर्शन दुधाने यांनी विद्यार्थ्यांना पक्षांच्या विविध प्रजाती विषयी मार्गदर्शन केले. तसेच अजिंक्य भटकर व तेजस पारशीवनीकर यांनी विद्यार्थ्यांना पक्षांच्या अधिवासाबद्दल तसेच पक्षी निरक्षणाविषयी विस्तृत माहिती दिली.
शैक्षणिक सहलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय टेकाडे व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन कोंगरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. डॉ. मनीषा भातकुलकर, ग्रीन क्लब फॅकल्टी कॉर्डिनेटर व डॉ. अविनाश इंगोले हे शैक्षणिक सहलीचे समन्वयक होते. शैक्षणिक सहलीला अजिंक्य भटकर, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी तसेच मानद वन्यजीव रक्षक, नागपुर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक सहली दरम्यान गोरेवाडा जैवविविधता उद्यानातील वनरक्षक तसेच सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विशेष सहकार्य केले. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.