मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करिता स्विमेथॉन संपन्न

    17-Apr-2024
Total Views |

Swimathon held to create awareness among voters for voting 
 
नागपूर :
जिल्हा निवडणूक कार्यालय व नागपूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने स्विमॅथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले. मिशन डिस्टिकशन 75% अंतर्गत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती पर विविध कार्यक्रमांचे प्रशासनातर्फे आयोजन करण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून स्वीमेथॉनचे आयोजन करण्यात आले. या स्विमॅथॉनमध्ये 93 जलतरणपटूंनी सहभाग नोंदवून नवा विक्रम केला. नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक श्री शेखर पाटील यांच्या शुभहस्ते स्विमेथॉन ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाला. याप्रसंगी अर्जुन अवार्डी श्री विजय मुनीश्वर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, स्वीप आयकॉन व स्विमॅथॉनचे तांत्रिक प्रमुख जयंत दुबळे, गुरुदास राऊत, माजी क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी संजय दुधे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने मिशन डिस्टिंक्शन 75% च्या अंतर्गत या स्विमेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व सहभागी जलतरणपटूंना मतदानाबाबतची शपथ देखील देण्यात आली. या स्विनेथॉनमध्ये विविध वयोगटांचा समावेश करण्यात आला होता. सहा तास चाललेल्या या स्विमॅथॉन मधून सर्व जलतरणपटूंनी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी संदेश दिला.
 
मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित मिशन डिस्टिंक्शन 75% अंतर्गत स्विमेथॉन चे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग च्या मानेवाडा -बेसा रोड वरील स्विमिंग पूल वर आयोजन करण्यात आले. विविध गटातील सहभागींना विशेष सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उन्नती शंभरकर व नितिषा शंभरकर या आई व कन्या यांनी सतत दोन तास स्विमिंग केले . पन्नास वर्षावरील वयोगटांमध्ये संजय करिया, अब्दुल जमील व नलिमा धारकर यांनी सतत तीन तास स्विमिंग केले. दिव्यांग स्विमर्स गटातून गुरुदास राऊत, दिलीप भोयर व अक्षय नेवारे तर रामटेक चे ऋषिकेश किंमतकर यांच्या संपूर्ण परिवाराने दोन तास स्विमिंग करून पारिवारिक गटातील प्रथम स्थान प्राप्त केले. आणि या विविध गटातील जलतरणपटूंना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय सोहळ्यास ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शारदा नायडू, सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. तुषार खेरडे, राष्ट्रीय सायकलिस्ट रेणू सिद्धू, माजि क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व अतिथींचे स्वागत जयंत दुबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी श्रीमती माया दुबळे यांनी केले.