रामटेकचा कल मोदींना पंतप्रधान करण्यासाठी : राजू पारवे

    17-Apr-2024
Total Views |
- जनसंवाद रथ यात्रेचे हिंगणा विधानसभा क्षेत्रात जोरदार स्वागत
- महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला ‘धनुष्य बाणा’चा उत्साहात प्रचार
 
Raju Parves Jansamwad Rath Yatra in Hingana assembly constituency
 
 
रामटेक :
देशासह जगात परिवर्तन घडविण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आहे. याची प्रचिती संपूर्ण जगाला आली आहे. गेल दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने देशाला विकसित भारताकडे नेण्याचे काम केले. याशिवाय गावापासून तर शहरापर्यंत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पंतप्रधान मुद्रा योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजनांचा लाभ मिळाला. देशात झालेल्या प्रगतीला पाहून रामटेकच्या मतदारांची मते ही नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणार, असा विश्वास महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू पारवे यांनी व्यक्त केले.
 
हिंगणा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कान्होलीबारा गावात पार पडलेल्या जनसभेत राजू पारवे बोलत होते. हिंगणाचे आमदार समिर मेघेंच्या मार्गदर्शनात जनसंवाद रथ यात्रा गेल्या दोन दिवसांपासून प्रचार करीत आहे. मंगळवारी हिंगणा विधानसभेत येणाऱ्या कान्होलीबारा, खापरी, टाकळघाट आदी गावांमध्ये गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
पुढे बोलतांनाराजू पारवे म्हणाले की, यापूर्वी मी उमरेड विधानसभा क्षेत्रात केलेल्या कामाला बघून मला महायुती सरकारने रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली. आता मला रामटेकमध्ये येणाऱ्या हिंगणा, सावनेर, नरखेड, कामठी, रामटेक व उमरेड या सहाही विधानसभा क्षेत्राची मोठी जबाबदारी आली आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न हे संसदेत पोचविण्याकरिता आपण रामटेकच्या मतदारांनी महायुतीला मत देऊन आपला आशिर्वाद द्यावा, असे आवाहनही राजू पारवे यांनी केले.
 
आपले अमुल्य मत हे निर्णयाक ठरणार
पुढे बोलतांना राजू पारवे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच विविध योजना आणल्या. वर्षानुवर्षे प्रलंबित कामे मार्गी लावली. केंद्र सरकारने केलेली संबंधित कामे व कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचले आहे. त्यामुळेच आज रामटेक निवडणुकीच्या प्रचारात गावा गावांतून मिळत असलेला प्रतिसादातून येणारे यश हे आपल्या सर्वांच्या पदरी पडणार आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपले अमुल्य मत हे निर्णयाक ठरणार. तसेच मला संसदेत पाठविण्यासाठी मोलाचे योगदान करणार, असेही राजू पारवे यावेळी म्हणाले.
 
मी जनसंवाद रथ यात्रेतून प्रत्येक ग्रामवासींयाची भेट घेत आहे. गावातील महिला, पुरुष, तरुण भर उन्हात माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असताना मला दिसून येत आहे. कुणी रांगोळी काढली तर कुणी पुष्पवर्षाव करत आहेत. गावात स्वागताचे औषण हेच आपण दिलेल्या आशिर्वादाची पावती आहे, त्यामुळे मी भारवलो आहे. रामटेक क्षेत्रात येणाऱ्या हिंगणा विधानसभेतील मुलभूत तसेच विकासाभिमूख कार्य करण्यासाठी मला आपली साथ लागणार, असल्याचेही ते म्हणाले.
 
विकासाकरिता ‘धनुष्य-बाणा’ला मतदान करा : आ. समीर मेघे
‘सर्वसामान्य नागरिकांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने मागील दहा वर्षांत देशात मोठे काम केले. गेली दहा वर्षे रामटेकमध्ये महायुतीने लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे.
 
मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. आपल्या क्षेत्राच्या विकासाकरिता येणाऱ्या 19 एप्रिलला आपण पहिल्याच क्रमांकाच्या धनुष्य बाण चिन्हाची बटन दाबून नरेंद्र मोदी यांना मत द्या असे हिंगणा विधानसभेचे आमदार समिर मेघे यांनी केला. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभाग होता. प्रचार रथाचे सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.