वडधामन्यात शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार; आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात

    14-Apr-2024
Total Views |

Youth killed in Shivshahi clash in Waddhamana
 
 
वाडी :
रस्त्याने पायदळ जाणाऱ्या तरुणाला भरधाव शिवशाही बसने जोरदार धडक दिली. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना वडधामना येथे गुरुवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. रोशन बन्सोड (वय ४२), रा. सूर्या रोड लाईन्स, वॉर्ड क्र. १, सुराबडी असे मृतकाचे नाव आहे.
 
याप्रकरणी फिर्यादी संतोष दिगंबर वाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास वाडी पोलिस करीत आहे.
 
मृतक रोशन हा अमरावती रोडवर वडधामना येथील सारंग बार समोरून रस्त्याने पायदळ जात असताना एमएच- ०६/बी.डब्ल्यू-०१४० क्रमांकाच्या शिवशाही बसचा चालक विजय अशोक निखाडे (४३), रा. बुटीबोरी याने रोशन यांना जोरदार धडक दिली. उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.