अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

    13-Apr-2024
Total Views |
 
-सावर्डी गावाजवळची घटना

youth killed in collision with unknown vehicle
(Image Source : Internet/ Representative)
अमरावती:
मआयडीसी, नांदगावपेठ येथे काम करणार्या मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 9 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता घडली. प्रदीपकुमार सिन (50, बधकुल, जि. छपरा, बिहार) असे मृतकाचे नाव आहे.
 
बिहार येथील रहिवासी असलेले प्रदीपकुमार सिन हे अनेक महिन्यांपासून नांदगावपेठ एमआयडीसीतील एचएच डोस कंपनीत कामाला आहेत. 9 एप्रिल रोजी सावर्डी रोडवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णवाहिकेत बसवून इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.