बिजापूर येथील शासकीय निवासी मुलींच्या पोर्टा-केबिनला आग

    07-Mar-2024
Total Views |

massive fire broke out in a government residential girls porta-cabin in Bijapur
 (image source: internet/representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
छत्तीसगडमधील बिजापूर येथे शासकीय निवासी मुलींच्या पोर्टा-केबिनमध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवपल्ली पोलीस ठाण्याच्या चिंताकोंटा पोर्टाच्या केबिनला बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.
 
 
आगीची माहिती मिळताच केबिनमधील सर्व मुलींना त्वरित सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेबद्दल स्थानिकांकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारच्या जीविहनीचे वृत्त अद्याप आलेले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.