देवरिया येथे भीषण अपघात; सिलेंडरच्या स्फोटात चौघांनी गमावला जीव

    30-Mar-2024
Total Views |
 
Four people lost their lives in a cylinder blast
 (image source: internet/representative)
 
एबी न्यूज नेटवर्क:
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात एका महिलेसह तीन मुलांनी आपला जीव गमावला आहे. डुमरी निवासी शिव शंकर यांच्या घरात शनिवारी, ३० मार्च रोजी सकाळी हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत घरातील महिला आणि तिची तीन मुलं जिवंत जळाल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये ४० वर्षीय आरती गुप्ता, १२ वर्षीय आंचल, ११ वर्षीय कुंदन आणि ११ महिन्यांची चिमुकली तृप्ती यांचा समावेश होता.
 
जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंग यांनी सांगितले की, 'आरती सकाळी स्वयंपाक घरात काम करत होती. दरम्यान अचानक सिलेंडरला आग लागली आणि स्फोट झाला. या अपघातात आरती आणि तिच्या तिन्ही मुलांनी जीव गमावला. दरम्यान आरतीचा पती शिवशंकर घराबाहेर असल्यामुळे त्याचा जीव वाचला. पीडित कुटुंबियाला नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल.'