Jharkhand: जमशेदपूरमधील एका टायरच्या गोडाऊनला भीषण आग

    30-Mar-2024
Total Views |
 
A massive fire broke out at a tire godown in Jamshedpur
 (image source: internet/representative)
 
एबी न्यूज नेटवर्क:
जमशेदपूरच्या बर्मा माईन्स परिसरातील लाल बाबा ट्यूब कंपनीच्या आवारात असलेल्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी संध्याकाळी जवळपास ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
घटनेबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
 
 
बर्मा माईन्सचे पोलिस स्टेशन प्रभारी आलोक कुमार दुबे यांनी सांगितले की, 'आम्हाला या घटनेची माहिती अर्धा तास आधी मिळाली होती. टाटा स्टील आणि झारखंड पोलिसांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मात्र, आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे.'