Jammu-Kashmir: रामबनमध्ये भीषण रस्ता अपघात; १० जणांचा मृत्यू

    30-Mar-2024
Total Views |

10 people died in a major accident in ramban
 
 
एबी न्यूज नेटवर्क:
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रामबनमध्ये राष्ट्रीय महामार्गावर एक प्रवासी टॅक्सी घसरून खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला.
 
 
पहाटे जवळपास १:१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि रामबन सिव्हिल क्विक रिस्पॉन्स टीमने त्वरित घटनास्थळी पोहोचून बचावकार्यास सुरुवात केली. मुसळधार पावसात १० प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रवासी टॅक्सी श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होती. दरम्यान, टॅक्सी अचानक जवळपास ३५० मीटर खोल दरीत पडली. पहाटे जवळपास २ वाजेपासून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. या दुर्घटनेत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.