नवनीत राणांच्या बोगस जातप्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल

    27-Mar-2024
Total Views |
- भाजप द्विधा मनस्थितीत! विरोधात आला तर...
 
Navneet Rana

 
अमरावती :
उच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोषी ठरविलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचा निकाल १ एप्रिलला येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपाने जरी अमरावतीची जागा आपल्याला सोडविलेली असली तरी राणा अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
 
दुसरीकडे राणा यांना बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे. अशातच निकाल काय लागतो यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.
 
राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर निकाल लागल्यानंतर लगेचच २ एप्रिलला भाजपा त्यांना उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. यानंतर ४ एप्रिलला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे. आता राणा अपक्ष लढणार की भाजपाच्या तिकीटावर हे अद्याप समोर आलेले नाही. राणा यांच्याऐवजी उद्योजिका कल्पना सरोज यांच्याही नावाचा विचार भाजपा करत असल्याचे समजते आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. उच्च न्यायालयातील अनेक तारखांना राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.