अचानक SBI ची YONO सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांची उडाली तारांबळ; कारण झाले स्पष्ट

    23-Mar-2024
Total Views |

Suddenly SBI YONO service stopped
(Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
भारतीय स्टेट बँक द्वारे ग्राहकांना दिली जाणारी नेट बँकिंगची सेवा ज्यात YONO अँपचा समावेश आहे ती बंद झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती.
 
SBI ची YONO सेवा, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ॲप सेवा 23 मार्चला काही काळ वापरू शकत नाही असे आधीच सांगण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक आज काही काळासाठी काही एसबीआय सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत परंतु या कालावधीत खातेधारक UPI लाईट आणि एटीएम वापरून सेवेचा लाभ घेऊ शकतील.
एसबीआयने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की खातेधारकांना 23 मार्च रोजी दुपारी 1.10 ते 2.10 वाजेपर्यंत म्हणजेच एका तासासाठी इंटरनेट बँकिंग सुविधेचा लाभ घेता येणार नाही. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, बिझनेस वेब, मोबाईल ॲप आणि UPI सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. पण त्याऐवजी ग्राहकांना UPI लाईट आणि ATM वापरता येणार आहे.
याशिवाय, बँकेने दिलेल्या माहितीत असेही म्हटले आहे की ग्राहक कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी SBI टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करू शकतात. याशिवाय बँकेच्या वेबसाइटवरूनही माहिती मिळू शकते.
खातेदार या कालावधीत UPI वापरू शकणार नाहीत परंतु त्याऐवजी UPI Lite वापरून पेमेंट करू शकतील, असे बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.