दिलीप वळसे पाटील यांच्याकडे NCPच्या लोकसभा जाहीरनामा समितीची धुरा

23 Mar 2024 14:55:41

Dilip Walse Patil
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
 

NCP Manifesto Committee 
 
या जाहीरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे,मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0