(image source: internet)
पाटणा :
बिहार राज्यातील सुपौल येथे तयार होत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा स्लॅब कोसळल्याची बातमी समोर आली आहे. येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅब अचानक कोसळला. या अपघातात येथे उपस्थित असलेले बरेच मजूर स्लॅब खाली दबले गेले असून एका मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. स्लॅब खाली दबलेल्या मजुरांना काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
सुपौलचे जिल्हा दंडाधिकारी कौशल कुमार यांनी सांगितले की, 'भेजा आणि बकौर जिल्ह्यांदरम्यान मरीचाजवळ एका बांधकामाधीन पुलाचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत.'
सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत, सुपौल येथे देशातील सर्वात लांब पूल बांधल्या जात आहे. जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम केले जात आहे. याची लांबी १०.२ किमी पेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ट्रान्स रेल कंपनीद्वारे पुलाचे बांधकाम केले जात आहे.