स्टेटसशी निगडीत WhatsApp ने आणले भन्नाट फिचर

    20-Mar-2024
Total Views |

WhatsApp Status
(Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, व्हॉट्सॲपची क्रेझ इतकी वाढत चालली आहे. व्हॉट्सॲप प्रत्येक वेळी काही नवे अपडेट्स युजर्ससाठी सादर करत असते. आता व्हॉट्सॲपवर स्टेटस पोस्ट करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
 
WhatsApp ने आणलेल्या नवीन फीचरबद्दल बोलायचे झाले तर, २४ तासांनंतर डिलीट होणारे स्टेटस, दीर्घकाळ चालणार आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या नवीन फीचरमध्ये स्टेटस टाकणाऱ्यांसाठी व्हॉट्सॲप स्टेटस कॉन्टॅक्ट मेन्शनचा पर्याय देण्यात आला आहे. हे नवीन फीचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले आहे. नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही ज्या युजरसाठी स्टेटस ठेवले आहे त्याला टॅग करू शकता. यामुळे त्या व्यक्तीला थेट सूचना जाईल की तुम्ही त्यांच्यासाठी स्टेटस ठेवले आहे.
 
WhatsApp च्या या नवीन फीचरची माहिती त्याच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. व्हॉट्सॲप अँड्रॉइड 2.24.6.19 बीटा व्हर्जनमध्ये हे नवीन फीचर समाविष्ट करण्यात आले असून तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. स्थिर आवृत्तीमध्ये हे वैशिष्ट्य कधी लागू केले जाईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 
व्हॉट्सॲपबद्दल बोलायचे तर, हे सध्याचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि ते सतत नवीन अपडेट्स मिळवत आहे. आता व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर युजर्ससाठी किती उपयुक्त ठरते ते पाहावे लागेल.