नागपूर :
सामाजिक, पत्रकारिता, साहित्य धार्मिक, विद्यार्थी व विविध, चळवळीत,उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, दलीत मित्र, पुरस्कारासाठी, नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑफ बँकेचे ज्येष्ठ संचालक, समता जेशीस चे सचिव रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कोल्हटकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
अशोक कोल्हटकर यांना या अगोदर दलीत साहित्य अकादमी न्यू दिल्ली तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, उत्कृष्ठ जनसंपर्क अधिकारी पुरस्कार, संविधान फाऊंडेशन तर्फे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार, समता सैनिक दला तर्फे समता योद्धा पुरस्कार, रिपब्लिकन मित्र पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले समता पुरस्काराने तसेच नुकतेच त्यानं हैद्राबाद येथे राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यांनी 28 वर्षा पासून पवित्र दिक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी निःशुल्क भाविकांना, पाणी बॉटल, औषध वितरण, अल्पोहार शैक्षणिक साहित्य वितरीत करतात.
मनपाचे जनसंपर्क अधिकारी असताना सर्व कार्यालयात संविधान प्रास्ताविक लावले फ्रेम लावण्यात पुढाकार घेतला, व संविधान चळवळ राबविली, त्यांनी बेझन बाग हर्षवर्धन बुद्ध विहार येथे संविधान प्रास्ताविक शिलालेख, व संविधान पार्क तयार करण्यास पुढाकार घेतला, असे अनेक सामाजिक जागृतीचे कार्य त्यांनी हिरहिरीने केले याच कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल हितचिंतक व मित्र परिवार यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.