राष्ट्रीय माध्यमिक हिंदी विद्यालयात निरोप समारंभ

    26-Feb-2024
Total Views |

Farewell Ceremony at National Secondary Hindi Vidyalaya
 
वाडी :
डिफेन्स येथील राष्ट्रीय माध्यमिक हिंदी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक शिक्षण संस्थेचे सहसचिव सुर्यभान सांबारे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष दिगांबर जगताप, सचिव सत्येंद्र प्रसाद, कोषाध्यक्ष अशोक खराटे, जि. प.उच्च प्राथमिक शाळा दवलामेटीच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रियदर्शिनी मौंदेकर उपस्थित होत्या.
 
सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्य, भाषण व इतर कार्यक्रम सादर केले. शालेय स्तरावर आयोजित केलेल्या कबड्डी, खो-खो, फुटबॉल, लंगडी,शिक्षक दिवस समारोह, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये सहभागी व विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
शालेय स्तरावर सोबतच विज्ञान प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन ज्येष्ठ शिक्षक ऋषीकुमार वाघ व आभार प्रभारी मुख्याध्यापिका अर्चना कोसे यांनी मानले. यावेळी मनोज विश्वकर्मा, विकास कोल्हे, जितकुमार, जि. प. हायस्कूल अंबाझरीच्या प्रभारी मुख्याध्यापिका यावले, दिलीप तराळेकर, प्रफुल्ल काळे, बंडू लोहारे, सुरेश भोयर, आनंद नंदनवार, राजू हुमने, अभिलाष पडोळे, वनिता गावंडे, बळीराम मोरे उपस्थित होते.