Nagpur : लेझर ड्रोन लाईट शो द्वारे शिवजयंती साजरी

    22-Feb-2024
Total Views |
 
Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show
 
नागपूर :
भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण नागपूर द्वारे आमदार मोहन मतेंच्या मार्गदर्शनात सक्करदरा तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रोन लाईट शो, लेझर मॅपिंग शो तसेच फटका शो चे भव्य आयोजन करण्यात आले.
 
Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
शिवाजी महाराजांवरील लघुकथापट तसेच भारतीय संस्कृतीची संक्षिप्त गाथा अत्यंत सुंदररित्या मोकळ्या आसमनतात अंकीत करण्यात आली.
 
Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
या उत्साहपूर्ण कार्यक्रमात सुमारे ४०,००० हून अधिक युवक-युवती तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.

Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांद्वारे मेक इन इंडिया च्या आधारे तयार केलेल्या या तंत्रात्मक कलाकृ‌तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
उपरोक्त शिवजयंती सोहळा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नागपूर संस्थांचे मुधोजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेत पार पडला.

Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून भारतीय जनात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विधानपरिषदेचे माजी सदस्य गिरीश व्यास, भाजपा शहर उपाध्यक्ष संजय ठाकरे, नागपूर संस्थांचे राजे संग्राम सिंह भोसले, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कोते साहेव, नागपूर विद्यापीठाचे विष्णु चांगदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Nagpur Shiv Jayanti celebrated with Laser Drone Light Show 
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण नागपूरच्या भाजयुमो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.