भिलाई IIT च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी लावली हजेरी; वर्चुअल पद्धतीने केले उद्घाटन

    20-Feb-2024
Total Views |
 
Prime Minister Narendra Modi inaugurated the campus of IIT Bhilai virtually
 
 
एबी न्यूज नेटवर्क:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वर्चुअल पद्धतीने IIT भिलाईच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णु देव साई, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दुर्गचे खासदार विजय बघेल यांची उपस्थित होते. आयआयटीच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष के. वेंकटरामन आणि आयआयटीचे संचालक प्राध्यापक राजीव प्रकाश यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती.
 
आयआयटी भिलाईचे कॅम्पस हे जवळपास ४०० एकर क्षेत्रफळात पसरलेले आहे. या कॅम्पसच्या बांधकामासाठी एकूण जवळपास १०९० कोटी रुपयांची लागत लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १४ जून २०१८ मध्ये या IIT कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली होती. ८ जुलै २०२० पासून या कॅम्पसचे बांधकाम सुरु झाले असून जवळपास ४ वर्षांत पूर्ण झाले.
 
आयआयटी भिलाईच्या या भव्य कॅम्पसमध्ये सध्या ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी या कॅम्पसमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स आणि पीएचडी सारखे विविध कोर्स उपलब्ध आहेत.
 
छत्तीसगडला शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्याचे काम सातत्याने सुरु आहे. यापूर्वी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यातील २११ शाळांच्या विकासाची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान श्री योजनेअंतर्गत या शाळांच्या विकासाचे कार्य केले जाणार आहे.