असा करा Google Chrome चा वापर

    17-Feb-2024
Total Views |

Google Chrome
(Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सध्याच्या हायस्पीड युगात आपण सर्वच जन इंटरनेटचा वापर करत आहोत, यात विशेषतः गुगल क्रोमचा वापर करीत विविध वेबसाईटवर भेट देत आहोत.
 
आपण सहसा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम वापरत करतो, पण हे आपल्याला घातक ही ठरू शकेल, कारण, गुगल क्रोम भारतात धोक्याचे ठरू शकते. Google Chrome ने जवळपास 66 टक्के सर्च मार्केट व्यापले आहे. अशा परिस्थितीत सर्व मोबाइल, लॅपटॉप आणि संगणक वापरकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. गुगल क्रोममध्ये सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचा वापर केल्याने तुमची संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते.
 
- इंटरनेट ब्राउझ करताना वापरकर्त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगली हवे.
 
- आपण कोणत्याही अनोळखी वेबसाइटला भेट देतांना काळजी घ्यावी.
 
- वापरकर्त्यांनी कोणत्याही थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करणे टाळावे.
 
- तसेच कोणत्याही अनावश्यक ईमेल किंवा संदेशांना उत्तर देऊ नये, त्यांच्याशी संवाद करणे टाळावे.