अमेरिकी विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी तुरुंगात आढळले मृतावस्थेत; बायडन यांनी पुतिन यांना ठरवले जबाबदार

    17-Feb-2024
Total Views |

us opposition leader alexei navalny found dead in prison
 (image source: internet)
 
एबी न्यूज नेटवर्क:
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे टीकाकार विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे या बातमीवर वक्तव्य देखील समोर आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुतिन यांना या मृत्यूबद्दल जबाबदार ठरविले आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तुरुंगात फिरल्यानंतर नवलनी यांची प्रकृती अचानक खालावू लागली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलेक्सी नवलनी यांच्या संशयास्पद मृत्यूसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना जबाबदार ठरवत शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये वक्तव्य केले.
 
 
एका वृत्तानुसार, २०२१ मध्ये जो बायडन यांनी चेतावणी देत म्हटले होते की, 'जर नवलनी तुरुंगात मरण पावला तर रशियाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल.' मात्र, या भयानक परिणामांबद्दल विचारले असता याबद्दल सविस्तर माहिती देण्यास बायडन यांनी नकार दिला होता.