रामटेक:
श्रीक्षेत्र तेली समाज धर्मशाळा अंबाला, रामटेक, संताजी सामाजिक संस्था व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथील सुपर मार्केट प्रांगणात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सामाजिक माहितीपर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संत जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर समाजाचे वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नागपूर संजय पाटील, जि.प. नागपूरच्या कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सत्यपाल महाराज यांचा महासभेचे अध्यक्ष विजय हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लक्ष्मणराव (बाबूजी) मेहर, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष भावुराव रहाटे, नरेश धोपटे, बिकेंद्र महाजन, नाना उराडे, राजेश शाहू, राहुल किरपान, अरविंद अंबागडे, आलोक मानकर, प्रतिभा कुंभलकर, नमिता चोपकर, करुणा आस्टनकर ,वर्षा सावरकर,वंदना पाटील,सुरेखा उराडे,लता कामडे, आदी उपस्थित होते. संचालन कांचनमाला माकडे यांनी केले. विजय हटवार, भाऊराव रहाटे, बिकेंद्र महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा तसेच सध्याचे राजकारण व शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करत मुलांना संघटित करून त्यांना उच्चशिक्षित बनविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हृषीकेश किंमतकर, राजेश शाहू, आनंद चोपकर, विश्वनाथ कापसे, मोरेश्वर माकडे, अजय खेडगरकर, कार्तिक उराडे, नितीन वेरूळकर आदींनी प्रयत्न केले.