श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचा वर्धापन दिन 18 रोजी

    16-Feb-2024
Total Views |

- धर्मभास्कर सद्गुरुदास महाराजांची उपस्थिती
 
Vishnudas Maharaj
 
 
नागपूर :
श्रीविष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र (Shri Vishnudas Maharaj Adhyatma Sadhana Kendra) रेशीमबाग आणि कर्वेनगर यांचा संयुक्तिक वर्धापन दिन सोहळा रविवार, 18 फेब्रुवारी रोजी रेशीमबाग येथील श्रीसर्वेश्वर हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
 
या कार्यक्रमाला धर्मभास्कर श्री सद्गुरुदास महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सकाळी 8.30 वाजता श्री गुरुचरित्राचे चक्री पारायण करण्यात येणार असून 4.30 भजनसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. 5.30 वाजता 'संत येती भूवरी' ही लघुनाटिका तर 7 वाजता सद्गुरुदास महाराजांचा आशीर्वचनचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सद्गुरू स्तवन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत तुंगार, किशोर कांत यांनी केले आहे.