दुचाकी अपघातात इसम जखमी

15 Feb 2024 18:44:37

accident
(Image Source : Internet/ Representative)
 
अमरावती :
भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी चालवून दुचाकी चालकाने रस्त्याने पायदळ जात असलेल्या एका इसमाला धडक दिली. या अपघात पायाला गंभीर इजा झाल्याची घटना नंदनवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ वडाळी बस स्टॉप कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री घडली.
 
याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी क्रमांक एम एच 27 ए एस 1097 च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी लखनलाल रामलाल किल्लेकर (रा. गवळी औरंगपूर ता. अचलपूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांना त्यांचा नातू नागेश घनश्याम जगणेवाले यांनी उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहे. फिर्यादी हे लग्ना करिता वडाळी येथे आले असता ते नातीसाठी औषध घेऊन जात असताना आरोपीच्या दुचाकींनी त्यांना धडक दिली व जखमी केले. या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0