छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद

14 Feb 2024 15:00:10

slaughterhouses and meat shops closed on the occasion of chhatrapati shivaji maharaj jayanti
(image source: internet/representative)
 
नागपूर :
'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' (तारखेनुसार) दिनानिमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या मंजुर ठराव नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
 
त्यानुसार सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ ला 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' (तारखेनुसार) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0