नागार्जुना अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविदयालया अंतर्गत महारोजगार मेळावा

    10-Feb-2024
Total Views |
- अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या सुमारे १५०० जणांना रोजगाराचे वाटप करणार

maharojgar mela under nagarjuna engineering and management mahavidyalaya
 
 
नागपूर :  
अमरावती रोडवरील सातनवरी गावाजवळ स्थित मैत्रेय शैक्षणिक संस्थे द्वारा संचलित नागार्जुना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट ह्या महाविदयालयात २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी इंजिनिअरींग, मॅनेजमेंट, सायंस, कॉमर्स, एमसीए हया शाखांमधून पदविका, पदवी, पदव्युत्तर उमेदवार व आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्यांसाठी तसेच अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्वातील पदविका व पदवी च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे (maharojgar mela) आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे यांच्या हस्ते व सचिव अजय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 
सदर संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने ना नफा ना तोटा या तत्वावर अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण, दुर्गम व आदिवासी प्रदेशातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामधे निवासाची व महाविद्यायालयात जाण्यायेण्याची निःशुल्क सेवा, मोफत पुस्तक पेढी, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास वर्ग, एमपीएससी व युपीएससी परीक्षाची तयारी तसेच बारावित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत एमएचसीईटी व जेईई चे वर्ग घेतले जातात, तसेच सर्व गुणवंत, होतकरु व गरीब विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात विशेष सुट दिली जाते.
 
विदर्भ व महाराष्ट्रातील ग्रामीण परीक्षेत्रातिल अनेक शिक्षित विद्यार्थी बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य सुंदर व उज्वल करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता ह्या एक दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
दुर्गम, आदिवासी भागातील, तळागाळातील गोरगरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मोठमोठ्या महानगरात नोकरी शोधतांना अनेक अडचणी येतात त्या दुर सारून एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक कंपन्या उपलब्ध करून देणे हा महाविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे.
 
सध्याच्या स्थितीत शिक्षित युवकांमधे बेरोजगारीची समस्या भेडसावणारी असून हया समस्येचे निराकरण करण्याच्या उददेशाने संस्थेने महारोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. हया मेळाव्यात टाटा कन्सलटन्सी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड, जाबील इंडीया लि., मास्टरसॉफ्ट, सांकी सोल्युशन्स प्रा. लि, समृद्धी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड व इतर ३० हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून १५०० हून अधिक उमेदवारांची निवड करणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी nietm.in या लिंकवर क्लिक करुन नोंदणी करुन सकाळी ९ वाजता हजर राहावे. ऐनवेळी सहभागी होण्यासाठी येणा-या इच्छुक उमेदवारांसाठी महाराजबाग नागपूर येथून महाविदयालयामार्फत सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत निशुल्क बससेवा पुरविण्यात येणार आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहान संस्थेतर्फे करण्यात येत आहे.