महेन्द्रा गाडीच्या धडकेत ७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

    06-Dec-2024
Total Views |
accident
(Image Source : Internet/ Representative)

नागपूर :
वर्धा रोडवरील अभिवन कॉलोनीत ५ डिसेंबर २०२४ रोजी सायं ९.३० ते १०.०० वाजेच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. कृष्णा नारायणराव भोयर (वय ७४), हे त्यांची अ‍ॅक्टीव्हा गाडी (एम.एच. ३१ ई.व्ही ४७६५) ने बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दंतेश्वरी झोपडपट्टीजवळ रामसंन्स हार्डवेअर दुकानाच्या समोर जात असताना, एक महेन्द्रा चार चाकी गाडी (एम.एच. ४० सि.क्यू ३९९६) चा चालक गाडी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत त्यांच्या गाडीला धडक दिली.

या धडकेत कृष्णा भोयर गाडीसह खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मेडीकल हॉस्पीटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.फिर्यादी प्रविण कृष्णा भोयर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेन्द्रा गाडी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे बजाजनगर येथे पोलिसांनी कलम २८१, १०६(१) भा.दं.सं.अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे.