नागपूरच्या फैजान शेख अपघात प्रकरणातील न्याय अद्यापही अपूर्ण; कुटुंबियांना न्यायाची आस

    05-Dec-2024
Total Views |
accident
(Image Source : Internet/ Representative)

नागपूर :
नागपूर येथील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या शेख फिरदोज आलम यांचा फैजान शेखचा १५ ऑगस्टच्या रात्री सावनेर येथे अपघातात मृत्यू झाला होता. फैजान हा नळाची मोटर बंद करण्यासाठी गेला असताना एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक देऊन चिरडत नेते. या अपघातात फैजानचा जागीच मृत्यू झाला.

कारमध्ये एकूण चार जण होते. त्यापैकी एक आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले, तर इतर तीन जण फरार झाले. मात्र, काही दिवसांतच पकडलेल्या आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.

या दुर्घटनेनंतर फैजानच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांनी प्रशासनाकडे न्यायासाठी वारंवार विनंती केली आहे. मात्र, चार महिने उलटूनही अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई आलेली नाही.

फैजानच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.