-अरविंद देशमुख महाविद्यालय व डी. बी. सायन्स महाविद्यालयाची विजयी सलामी
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, डिगडोह हिल्स, हिंगणा येथील मैदानात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. दातारकर होते तर शिव छत्रपती पुरस्कार पूनम कडव, टिचर इन्चार्ज डॉ. सुरेंद्र तिवारी, टेक्निकल हेड डॉ. धिरज बोसकर आणि डॉ. राजू राऊत यांची उपस्थिती होती.
मिलिंद्र माकडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना नागपूरने हँडबॉल स्पर्धा जिंकण्याची परंपरा कायम ठेवावी, असे उद्गार काढले. डॉ. दातारकर यांनी देशाला नागपूरने भरपूर खेळाडू दिल्याचे सांगितले.
अरविंद देशमुख महाविद्यालय, भारसिंगी व राणीबाई अग्निीहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्यामध्ये उदघाटनीय सामना अटीतटीचा झाला. यामध्ये अरविंद देशमुख महाविद्यालय, भारसिंगी यांचा 16-11 नी विजयी झाला.
महिलांमध्ये डी.बी. सायन्स महाविद्यालय, गोंदिया व गव्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरींग यांच्या मध्ये खेळला गेला. यामध्ये डी.बी. सायन्स महाविद्यालय, गोंदिया यांचा 3-2 नी विजयी झाला.
उद्घाटनीय सामन्यावेळी प्राचार्य डॉ निशांत मानापुरे, समीर चिटणीस, सी.ए. फ.ओ., एल.टी.जे.एस.एस., नागपूर, डॉ सोनाली बांद्रे, डॉ. मोहन कडवे, डॉ महेश महतो, डॉ नितीन येमदे हे प्रामुख्याने उपस्थित होते.