राज ठाकरे जे काही बोलले ती भाजपाची स्क्रिप्ट; संजय राऊतांच्या हल्लबोल

09 Nov 2024 15:05:26

Sanjay Raut criticizes Raj Thackeray
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्राची भाषा घाण केली, अशी टीका केली होती. त्याला आता राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
 
आम्ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. भाजपाची स्क्रिप्ट आहे. फडणवीस यांचे स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची तलवार आहेच, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
 
जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Powered By Sangraha 9.0